Environmental governance is a Environment concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2018, 2022, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
National Forest PolicyBasic environmental awareness
Real questions that test this
धोकादायक कचरा (व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक) नियम, 2008 नुसार हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधींत आणि भारताच्या कोणत्या भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल. / As per the Hazardous Waste (Management, Handling and Transboundary Movement) Rules, 2008, the shall be the nodal Ministry to deal with the transboundary movement of the hazardous wastes and to grant permission for transit of the hazardous wastes through any part of India.
a)पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार / Ministry of Environment and Forests, Govt. of India✓ Correct
b)गृह मंत्रालय, भारत सरकार / Ministry of Home Affairs, Govt. of India
c)परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार / Ministry of External Affairs, Govt. of India
d)वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार / Ministry of Commerce and Industry, Govt. of India
Under the Hazardous Wastes Rules, the Ministry of Environment and Forests (MoEF) acts as the central nodal ministry for handling transboundary movement and transit permissions.
वनविषयक धोरण आणि परिणाम
इकोलॉजी अँड पॉलिटिक्स ऑफ सरहायव्हल या त्यांच्या 1991 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात वंदना शिवा म्हणतात की, उष्णकटिबंधातील जंगलांच्या साधनसंपत्तीवर पर्यावरणदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या जगातील सर्वात मोठे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण जगाची अन्नसुरक्षा ही मुख्यत: पर्यावरणाचे स्थैर्य आणि उष्णकटिबंधात राहणाऱ्या किंवा विकसनशील देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणावरील परस्पर-संबंधांवर अवलंबून आहे.
वंदना शिवा, उष्णकटिबंधीय जंगलावरील संकट, जंगलांशी संबंधित प्रमुख तीन अर्थव्यवस्थांकडून होणाऱ्या जीववस्तुमानाचा संघर्षमय मागणीच्या संदर्भात स्पष्ट करतात.
1. आवश्यक पर्यावरणीय प्रक्रियांशी संबंधित नैसर्गिक अर्थव्यवस्था.
2. लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारी जगण्याशी संबंधित अर्थव्यवस्था.
3. औद्योगिक आणि व्यापारविषयक मागणी आधारित बाजारपेठीय अर्थव्यवस्था.
पर्यावरणाशी संबंधित नैसर्गिक अर्थव्यवस्था ही जंगलातील मृदाव्यवस्था टिकवणारी आणि जंगलाचे जलसंतुलन सांभाळणाऱ्या उत्पादनांची मागणी निर्माण करणारी असते. लोकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करणारी, जगण्याशी संबंधित जी अर्थव्यवस्था आहे, ती जंगलातील जीववस्तुमान जसे सरपण (जळण), चारा, फळे, बिया, हरितखत, लाकूड, इ. ची मागणी प्रतिबिंबित करते. अशा वस्तूंची मागणी जंगलात आणि जंगलपरिसात राहणाऱ्या लोकांकडून होत असते. बाजारपेठीय अर्थव्यवस्थेकडून औद्योगिक तसेच व्यापारी वापरासाठी मागणी निर्माण होते. या मागणीमुळे जंगलसंपत्तीतील अनेक जैविक घटक हे विविध वस्तूंच्या रूपात परिवर्तित होत असतात. उदा. लगदा प्लायवुड, फर्निचर, बांधकामासाठीचे लाकूड, इंधनासाठीचे लाकूड, इ. यामुळे शहरी बाजारपेठेत या वस्तू उपलब्ध होतात. भारतात नैसर्गिक अर्थव्यवस्था आणि जगण्याची अर्थव्यवस्था या कायम परस्परव्यास (अतिव्यापीत) राहिल्या आहेत. तसेच त्या कोणत्यात्यी अडथळ्याविना कार्यरत आहेत. संवर्धन आणि उपयोग या दोन्ही दृष्टीकोनातून या व्यवस्था स्थानिक जनसमुदायाच्या गरजा पूर्ण करत आहेत.
वसाहतवादी साम्राज्याने मात्र अनपेक्षित पद्धतीने या वापरात अडथळे निर्माण केले आहेत. जंगलांच्या पर्यावरणसंस्थेचे अनेक घटक विविध कार्यपद्धतीतून कार्यरत होते. मात्र वसाहतवादी धोरणातून जंगलांचा बहुउद्देशीय वापर संपुष्टात आला. त्याऐवजी एककलमी उदीष्ट असणारे वनीकरणायचे धोरण अमलात आणले गेले. अशा धोरणात व्यापारीदृष्ट्या मोलाच्या लाकडाचे उत्पादन वाढविणे महत्वाचे मानले गेले. आर्थिक किंवा पर्यावरणविषयक उद्दीष्टांना बाजूला सारून केवळ बाजारपेठांचा विचार बळावला. वसाहतवादोत्तर वनधोरणामुळे वनपुजांचा वापर-संघर्ष आणि जंगलांचे अवक्रमण (ह्रास) याबाबतची स्थिती आणखी गंभीर झाली. बाजारआधिष्टित मागणीनुसार उत्पादित होणारी कृत्रिम जंगले निर्माण करण्यात आली. शिवा शेवटी म्हणतात की, नैसर्गिक जंगलांचे रूपांतर लागद्यायोग्य लाकडाच्या लागवडीसाठी केल्यामुळे जंगलातील जैविक घटक उदा. लाकूड इंधन, चारा, खते इ. ची उपलब्धता कमी झाली. निलगिरी, देवदार, इ. वृक्षलागवडीमुळे एकाच प्रकारची वृक्षलागवड होऊन, हिमालय, पश्चिम घाट या डोंगराळ प्रदेशातील पर्यावरण प्रक्रियेला धोका पोहोचत आहे.
दिलेल्या उताऱ्यानुसार अन्नसुरक्षा ________ यावर अवलंबून आहे.
According to the given passage, food security depends on ________.
(a)अन्न धान्याचे उत्पादन / food production
(b)पर्यावरणाचे स्थैर्य / ecological stability
(c)पावसाळा / monsoon
(d)उष्णकटिबंधीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे आर्थिक कल्याण / economic welfare of the people living in tropical region
1)फक्त (a) / Only (a)
2)फक्त (b) व (c) / Only (b) and (c)
3)फक्त (b) व (d) / Only (b) and (d)✓ Correct
4)फक्त (a) व (d) / Only (a) and (d)
The passage says the food security of the entire world depends on linkages between ecological stability and the economic well-being of the people who live in the tropics. That is statements (b) and (d).
तुम्ही शहराच्या प्रदूषण नियंत्रणावर देखरेख करणाऱ्या विभागाचे प्रमुख आहात. 'ग्लोबल (जागतिक) हवा 2017' अहवाल वाचताना तुमच्या लक्षात आले की भारतातील ओझोनशी संबंधित बालमृत्युत वाढ होत आहे. तुम्ही / You are heading the department that looks after control of pollution in the city. While reading the report, 'State of Global Air 2017' it was evident to you that ozone related early deaths are increasing in India. You will
a)या समस्येबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आवश्यक माहिती गोळा कराल आणि गरज असल्यास आरोग्य विभागाच्या सहकार्याने उपक्रम कार्यान्वित करण्याचा निर्णय घ्याल. / Collect related data to know the reality of this problem in your city and then decide a course of action, if necessary, in collaboration with the health department.
b)शहराच्या वाहतूक विभागाच्या साहाय्याने वाहन प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भरवशाची सार्वजनिक वाहतूक पुरवण्याची योजना आखाल. / With the assistance of the transport department of the city, you will devise a plan for supplying reliable public transport for controlling vehicular pollution.✓ Correct
c)वाहन प्रदूषण नियंत्रणाची रणनीती आखण्याबरोबरच शहरात तसेच शहराभोवती आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची प्रणाली मिळवाल. / Along with developing strategies for controlling vehicular pollution, seek modern systems of managing garbage of all kinds found in the city as well as around the city.
d)वाहतूक विभागाच्या मदतीने दर दिवशी रस्त्यावर येणारी वाहने नियंत्रित कराल आणि शहरापासून दूरवर असलेल्या ठिकाणी कचरा वाहून नेण्यासाठी उत्तम सेतूजाल संघटित कराल. / With the help of the transport department, control the number of vehicles on the roads each day and organise a good network to transport garbage to a place away from the city.
Addressing ozone-related health hazards requires tackling the primary urban source—vehicular emissions—by establishing robust and reliable public transport systems in coordination with transport departments.