MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2025 CSAT — Question 42

The correct answer with a full explanation. Practice World History questions as a quiz →

हे सारं बद्धर्शी ग्रेटब्रिटन आणि त्याच्या वसाहतीमधलं चित्र म्हणता येईल. पण युरोपात औद्योगिक क्रांती फक्त ब्रिटनमध्ये झाली असं नव्हे तर ती फ्रान्स, हॉलंड, जर्मनी अशी सगळीकडे झाली. सगळीकडे ती एकच वेळी झाली असंही नाही. इंग्रजांच्या जशा वसाहती होत्या तशाच फ्रेंच व डच लोकांच्याही होत्या. जर्मनीच्या फार कमी. स्पेन आणि पोर्तुगालच्याही होत्या पण हे दोन्ही देश सगळयात आधी वसाहती करून नंतर स्वतः धार्मिक भानगडीत वेगवेगळ्या रस्त्यानं गुंत गेले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांच्या वसाहती मोठ्या होत्या. फ्रेंचांच्या, डचांच्या लहान होत्या; तरीही होत्या. जर्मनींत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेने अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडे फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर इंग्रजांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं. गेल्या शतकातल्या दोन्ही महायुद्धांना ही व्यापारी गरजांची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. या महायुद्धामुळे अपरिमित मानवी संहार, भीषण हानी होऊन युरोपातील जिंकणारे व हरणारे असे सारेच दुबळे होऊन गेले. या महायुद्धाची सगळ्यात कमी झळ पोहोचलेली अमेरिकेची संयुक्त संथाने-ज्यांचा उल्लेख सर्वसाधारणपणे आपण अमेरीका असा करतो ती-आणि ज्यांना सगळ्यात जास्त झळ बसली तो रशिया-ज्यात बाकी सोव्हियत प्रजासत्ताके होती-अशा दोन महासत्ता युद्धानंतर उदयाला आल्या.

महायुद्धानंतर कोणत्या दोन महासत्ता उदयाला आल्या ?

1)अमेरिका-रशिया✓ Correct
2)फ्रान्स-अमेरिका
3)इंग्रज-भारत
4)ग्रेट ब्रिटन-फ्रान्स

After the Second World War, the old European powers weakened, and the USA and the Soviet Union (Russia) emerged as the two dominant global superpowers, initiating the Cold War.

MPSC has asked 36 World History questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?