खालील जोड्या जुळवा - जीवनसत्वे व त्यांच्या अभावी होणारे रोग :
अभावाचे रोग :
i. मुडदूस
ii. स्कव्ही
iii. रक्तक्षय
iv. रातआंधळेपणा
Match the following - Vitamins and respective deficiency diseases :
Deficiency disease :
i. Rickets
ii. Scurvy
iii. Anaemia
iv. Night blindness
(a)अ जीवनसत्व / Vit. A
(b)ड जीवनसत्व / Vit. D
(c)क जीवनसत्व / Vit. C
(d)बी₁₂ जीवनसत्व / Vit. B₁₂
1)iii, ii, iv, i
2)iv, i, ii, iii✓ Correct
3)i, iv, iii, ii
4)ii, iii, iv, i
Matching vitamins with deficiency diseases: Night blindness is caused by Vitamin A (iv), Rickets by Vitamin D (i), Scurvy by Vitamin C (ii), and Anaemia by Vitamin B12 (iii). Thus the sequence is iv, i, ii, iii.
जीवनसत्त्वे ही सेंद्रिय घटके बऱ्याच अन्नपदार्थांमध्ये अतिशय कमी प्रमाणात असतात. शरीरातील बऱ्याच महत्त्वपूर्ण कार्यामध्ये त्यांची गरज असते; त्याचप्रमाणे बरीचशी जीवनसत्त्वे ही काही प्रमुख पोषकांच्या वापरासाठी जसे की प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट वगैरे कामात येतात. जरी जीवनसत्त्वे ही अतिशय कमी प्रमाणात वापरात येतात; तरी ती आरोग्य आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत जरूरी असतात. ह्या जीवनसत्त्वांचा जेव्हा त्यांच्या कार्यानुरूप शोध लागला परंतु त्यांची रासायनिक घडण पूर्ण माहित नव्हती तेव्हा त्यांना जीवनसत्त्व A, जीवनसत्त्व B, जीवनसत्त्व C, जीवनसत्त्व D अथवा त्यांच्या प्रमुख उपयोगासाठी जसे की; अँटिझेरोथैलेमिक, अँटिन्यूरीटीक, अँटस्कॉर्ब्युटिक आणि प्रतिजैविको जीवनसत्त्वे असे संबोधण्यात येत होते. ह्या जीवनसत्त्वांची रासायनिक घडण पूर्ण समजल्यानंतर त्यांना आता रेटिनॉल, थायमिन्, रिबोफ्लेविन, एस्कॉर्बिक आम्ल आणि कोल-कॅल्सीफेरॉल ह्या नावाने ओळखले जाते.
जीवनसत्त्वांचे सर्वसाधारणपणे वर्गीकरण हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे अथवा चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे असे केले जाते. B कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि एस्कॉर्बिक आम्ल हे आधिच्या वर्गात येतात तर जीवनसत्त्वे A, D, E आणि K हे चरबीमध्ये विरघळणारी असतात. पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे शरीरात साठून न राहता; ती उत्सर्जित केली जातात तर चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे ही शरीरात साठवली जातात. ह्याच कारणामुळे चरबीमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा जीवनसत्त्व A आणि D ह्यांचा अतिरेक हा घातक होऊ शकतो.
रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे अंधुक प्रकाशाही स्पष्ट दिसण्यासाठी जरूरी असते, त्यामुळेच A जीवनसत्त्वांची कमतरता ही रातांधळेपणा आणते. जीवनसत्त्व A चे आणखी एक कार्य म्हणजे एपिथेलीअल् उत्काला स्वस्थ राखणे. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे काही पदार्थांमध्ये जसे की लोणी, तूप, दूध, अंड्यातील बलक, प्राण्यांचे काळीज इत्यादी मध्ये असते. वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्त्व A हे रेटिनॉल ह्या प्रकारात नसते. ह्या अन्नपदार्थांमध्ये पिवळ्या रंगाचे कॅरोटिन-नावाचे रंग द्रव्य असते जे शरीरात गेल्यावर जीवनसत्त्व A मध्ये बदलते म्हणून त्यांना “प्रोव्हिटॅमीन् A” असे संबोधले जाते.
जीवनसत्त्व D हे हाडांच्या वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या चयापचयासाठी जरूरी असते. खाद्यपदार्थांमधून आलेले कॅल्शियम आतड्यात आल्यानंतर शोषण घेऊन ते हाडांमध्ये जमवण्याचे महत्त्वाचे काम जीवनसत्त्व D करते.
सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेमध्ये असलेल्या कोलेस्टेरॉल डेरीव्हेटिव्हचे जीवनसत्त्व D मध्ये रूपांतर करतात. जीवनसत्त्व D ची कमतरता ही रिकेटस् आणि ऑस्टिओमॅलेशियाला कारणीभूत ठरते. लहान मुलांमध्ये जीवनसत्त्व D चे प्रमाण 200 - 400 IU एवढे असावयास हवे; जे उष्णकटिबंधीय देशांमध्ये सूर्यप्रकाशात सहज उपलब्ध असते.
खालील वाक्ये नीट अभ्यासा :
(a) रेटिनॉल, थायमिन्, रिबोफ्लेविन आणि कोले-कॅल्सिफेरॉल ही जीवनसत्त्वे आहेत.
(b) जीवनसत्त्वे कमी प्रमाणात जरूरी असतात.
(c) ॲस्कॉर्बिक आम्ल, रेटिनॉल आणि क्लोरोफीन ही जीवनसत्त्वे आहेत.
(d) जीवनसत्त्व 'A' चे जरूरीपेक्षा जास्त ग्रहण करणे हे रातंधळेपणास कारणीभूत होते.
वरीलपैकी कोणते पर्याय/पर्याये सत्य आहेत?
Read the following statements :
(a) Retinol, Thiamin, Riboflavin and Chole-calciferol are Vitamins
(b) Vitamins are needed in small quantities
(c) Ascorbic acid, Retinol and Chlorofin are Vitamins
(d) Excessive intake of vitamin 'A' can lead to night blindness
Which of the option given above is/are correct?
(a)रेटिनॉल, थायमिन्, रिबोफ्लेविन आणि कोले-कॅल्सिफेरॉल ही जीवनसत्त्वे आहेत. / Retinol, Thiamin, Riboflavin and Chole-calciferol are Vitamins
(b)जीवनसत्त्वे कमी प्रमाणात जरूरी असतात. / Vitamins are needed in small quantities
(c)ॲस्कॉर्बिक आम्ल, रेटिनॉल आणि क्लोरोफीन ही जीवनसत्त्वे आहेत. / Ascorbic acid, Retinol and Chlorofin are Vitamins
(d)जीवनसत्त्व 'A' चे जरूरीपेक्षा जास्त ग्रहण करणे हे रातंधळेपणास कारणीभूत होते. / Excessive intake of vitamin 'A' can lead to night blindness
1)(a), (b) आणि (d) हे सत्य आहेत / (a), (b) and (d) are true
2)(c) आणि (b) हे असत्य आहेत / (c) and (b) are false
3)(c) आणि (d) हे असत्य आहेत / (c) and (d) are false✓ Correct
4)(a), (b) आणि (c) हे सत्य आहेत / (a), (b) and (c) are true
Retinol (Vit A), Thiamin (Vit B1), Riboflavin (Vit B2), and Cholecalciferol (Vit D3) are indeed vitamins. Vitamins are required in trace quantities. However, Chlorofin is not a vitamin, and excessive Vitamin A causes hypervitaminosis, not night blindness (deficiency causes night blindness).