सध्या बाजारात जननिक अभियांत्रिकीची अनेक उत्पादने आढळून येतात. उदा. इंटरफेरॉन, मानवाचे वृद्धीसंप्रेरक आणि मानवीय इन्स्युलिन. सन 1982 साली पुन:संयोजी जिवाणूने बनविलेले मानवीय इन्स्युलिन बाजारात विक्रीस आले. पूर्वी ही सर्व प्रथिने प्राण्यांच्या पेशीपासून शुद्ध केली जात होती. परंतु मानवावरील ही स्वरूपे त्यावेळी फार कमी प्रमाणात उपलब्ध होती.
1982 च्या पूर्वी मधुमेहात उपयोगात येणारी सर्व इन्स्युलिन केवळ गुरांच्या बोव्हीन व डुकरांच्या स्वादुपिंडापासून शुद्ध केली जात होती. ही सर्व इन्स्युलिन उत्पादके मांस कारखान्यात सह-उत्पादन म्हणून तयार व्हावयाची. इन्स्युलिनचा पुरवठा हा मांस कारखान्यातील पुरवठा व गरजेवर अवलंबून होता. पुन:संयोजी इ.कोलाय पेशीने व्यापारी तत्त्वावर तयार केलेल्या मानवीय इन्स्युलिनमुळे ते तयार करण्यात भविष्यात कमतरता राहण्याबाबत चिंता राहिलेली नाही.
याशिवाय ज्यांना मधुमेह झाला आहे व ज्यांना बोव्हीन अथवा पोर्सीनचे वावडे आहे त्यांच्याकरिता मानवीय इन्स्युलिन अत्यंत उपयुक्त ठरेल.
पुन:संयोजी डी.एन्.ए.चे तंत्र जीन थेरपीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते ज्यात ते प्रत्यक्षात सहभागी होऊन जीन साहित्यात फेरफार देखील करते.
There are several products of genetic engineering now available in the market viz. interferon, human growth hormone and human insulin. In 1982, human insulin produced by recombinant bacteria was released for sale in the market. All of these proteins were previously purified from animal tissues. But human forms were available only in very minute quantities.
Before 1982, all insulins which were utilized for diabetics were purified only from bovine of cattle and Porcine of pigs pancreas. These insulins were made available as by-products of meat industry. The insulin supply was, thus a function of supply and demand in the meat market. The commercial production of human insulin in recombinant E. Coli cells eliminated concerns regarding possible shortage of insulin in the future. In addition, this human insulin, was of particular importance to some diabetics who were allergic to bovine and/or porcine insulin.
Recombinant DNA techniques play an essential role in gene therapy which involves the direct manipulation of genetic material.
परिच्छेदास योग्य ते नाव सुचवा :
Suggest appropriate title to the paragraph :
a)जननिक अभियांत्रिकी आणि औषधे / Genetic Engineering and Medicines✓ Correct
b)जननिक अभियांत्रिकी / Genetic Engineering
c)माणसाचे इन्स्युलिन / Human insulin
d)इन्स्युलिन आणि मधुमेह / Insulin and Diabetics
The passage predominantly discusses the role of genetic engineering in producing medicines like insulin, making 'Genetic Engineering and Medicines' the most appropriate title.
खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत ?
Which of the following are branches of applied biology ?
(a)सुक्ष्मजीवशास्त्र / Microbiology
(b)कृषिविज्ञान / Agriculture
(c)औषध निर्माण शास्त्र / Pharmacy
(d)वैद्यकीय शास्त्र / Medical Science
1)फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
2)फक्त ब, क आणि ड / Only b, c and d✓ Correct
3)फक्त अ, क आणि ड / Only a, c and d
4)फक्त अ, ब आणि ड / Only a, b and d
Applied biology encompasses branches that apply biological knowledge to practical fields like agriculture, medicine, and pharmacology. Microbiology is a core/basic biological science.
कोणत्या जनुकीय रूपांतरीत पीकामाध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अ जीवनसत्त्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत ?
Name the transgenic crop in which three genes for synthesis of vitamin A are introduced through the technique of genetic engineering.
1)कल्याण सोना गहू / Kalyan Sona wheat
2)मधुर ज्वारी / Sweet sorghum
3)संकरीत बाजरी / Hybrid bajra
4)सुवर्ण तांदुळ / Golden rice✓ Correct
Golden Rice is a transgenic variety of rice created to synthesize beta-carotene (a precursor of provitamin A) using genetic engineering.
मानवी जीनोम प्रकल्प 1990" चे मुख्य उद्दिष्ट/ष्टे हे होते
(a)मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे.
(b)डी.एन.ए. मधील 5 बिलियन बेस पेअर्सचा क्रम निश्चित करणे.
(c)नव्याने प्राप्त जीनोमीक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करणे.
(d)प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे.
1)फक्त ब आणि ड
2)फक्त अ आणि क
3)फक्त अ✓ Correct
4)फक्त ब
The primary goal of the Human Genome Project (1990) was to identify all the 20,000 to 25,000 genes in human DNA and determine the sequences of the 3 billion (not 5 billion) chemical base pairs.