Micronutrients is a Science & Technology concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions (2015, 2021, 2022). Below are those real questions with their correct answers and explanations.
खालीलपैकी मॅक्रोन्युट्रिएंट कोणते आहे ? / Which of the following is a macronutrient ?
a)मॅग्नेशियम / Mg✓ Correct
b)मॉलिब्डेनिअम / Mo
c)बोरॉन / Bo
d)झिंक / Zn
Magnesium (Mg) is a macronutrient required by plants in relatively large amounts for chlorophyll synthesis and enzyme activation.
जीवनसत्त्वे ही सेंद्रिय घटके बऱ्याच अन्नपदार्थांमध्ये अतिशय कमी प्रमाणात असतात. शरीरातील बऱ्याच महत्त्वपूर्ण कार्यामध्ये त्यांची गरज असते; त्याचप्रमाणे बरीचशी जीवनसत्त्वे ही काही प्रमुख पोषकांच्या वापरासाठी जसे की प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट वगैरे कामात येतात. जरी जीवनसत्त्वे ही अतिशय कमी प्रमाणात वापरात येतात; तरी ती आरोग्य आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत जरूरी असतात. ह्या जीवनसत्त्वांचा जेव्हा त्यांच्या कार्यानुरूप शोध लागला परंतु त्यांची रासायनिक घडण पूर्ण माहित नव्हती तेव्हा त्यांना जीवनसत्त्व A, जीवनसत्त्व B, जीवनसत्त्व C, जीवनसत्त्व D अथवा त्यांच्या प्रमुख उपयोगासाठी जसे की; अँटिझेरोथैलेमिक, अँटिन्यूरीटीक, अँटस्कॉर्ब्युटिक आणि प्रतिजैविको जीवनसत्त्वे असे संबोधण्यात येत होते. ह्या जीवनसत्त्वांची रासायनिक घडण पूर्ण समजल्यानंतर त्यांना आता रेटिनॉल, थायमिन्, रिबोफ्लेविन, एस्कॉर्बिक आम्ल आणि कोल-कॅल्सीफेरॉल ह्या नावाने ओळखले जाते.
जीवनसत्त्वांचे सर्वसाधारणपणे वर्गीकरण हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे अथवा चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे असे केले जाते. B कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि एस्कॉर्बिक आम्ल हे आधिच्या वर्गात येतात तर जीवनसत्त्वे A, D, E आणि K हे चरबीमध्ये विरघळणारी असतात. पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे शरीरात साठून न राहता; ती उत्सर्जित केली जातात तर चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे ही शरीरात साठवली जातात. ह्याच कारणामुळे चरबीमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा जीवनसत्त्व A आणि D ह्यांचा अतिरेक हा घातक होऊ शकतो.
रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे अंधुक प्रकाशाही स्पष्ट दिसण्यासाठी जरूरी असते, त्यामुळेच A जीवनसत्त्वांची कमतरता ही रातांधळेपणा आणते. जीवनसत्त्व A चे आणखी एक कार्य म्हणजे एपिथेलीअल् उत्काला स्वस्थ राखणे. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे काही पदार्थांमध्ये जसे की लोणी, तूप, दूध, अंड्यातील बलक, प्राण्यांचे काळीज इत्यादी मध्ये असते. वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्त्व A हे रेटिनॉल ह्या प्रकारात नसते. ह्या अन्नपदार्थांमध्ये पिवळ्या रंगाचे कॅरोटिन-नावाचे रंग द्रव्य असते जे शरीरात गेल्यावर जीवनसत्त्व A मध्ये बदलते म्हणून त्यांना “प्रोव्हिटॅमीन् A” असे संबोधले जाते.
जीवनसत्त्व D हे हाडांच्या वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या चयापचयासाठी जरूरी असते. खाद्यपदार्थांमधून आलेले कॅल्शियम आतड्यात आल्यानंतर शोषण घेऊन ते हाडांमध्ये जमवण्याचे महत्त्वाचे काम जीवनसत्त्व D करते.
सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेमध्ये असलेल्या कोलेस्टेरॉल डेरीव्हेटिव्हचे जीवनसत्त्व D मध्ये रूपांतर करतात. जीवनसत्त्व D ची कमतरता ही रिकेटस् आणि ऑस्टिओमॅलेशियाला कारणीभूत ठरते. लहान मुलांमध्ये जीवनसत्त्व D चे प्रमाण 200 - 400 IU एवढे असावयास हवे; जे उष्णकटिबंधीय देशांमध्ये सूर्यप्रकाशात सहज उपलब्ध असते.
जीवनसत्त्वांचे वर्गीकरण असे केले जाते ____________.
Vitamins are classified as _________.
1)सेंद्रिय आणि असेंद्रिय / Organic and Inorganic
2)चरबीमध्ये विरघळणारी आणि पाण्यात विरघळणारी / Fat and Water soluble✓ Correct
3)अत्यावश्यक आणि अनावश्यक / Essential and Non-essential
4)संतृप्त आणि असंतृप्त / Saturated and Unsaturated
Vitamins are broadly classified based on their solubility into two categories: fat-soluble vitamins (A, D, E, K) and water-soluble vitamins (B-complex, C).
मॅक्रोलेमेंट्स म्हणजे काय ?
What are macroelements ?
1)जे घटक कमी प्रमाणात लागतात / Elements required in small amounts
2)जे घटक सम प्रमाणात लागतात / Elements required in equal amounts
3)जे घटक जास्त प्रमाणात लागतात / Elements required in large amounts✓ Correct
4)वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above
Macroelements are essential plant nutrients required in relatively large amounts for growth and development, unlike micronutrients.
वनस्पतीच्या सामान्य वाढीकरिता कोणता घटक जास्त प्रमाणात आवश्यक असतो ?
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
Which element is required in higher amounts for normal plant growth ?
Which of the statements given above is/are correct ?
(a)पोटॅशियम
(b)बोरॉन
(c)क्लोरीन
(d)मॅग्नेशियम
1)फक्त (a) / Only (a)✓ Correct
2)फक्त (a) आणि (b) / Only (a) and (b)
3)फक्त (c) / Only (c)
4)फक्त (d) / Only (d)
Potassium is a macronutrient required in large quantities by plants for various physiological functions like osmoregulation and enzyme activation.