MPSC PYQ

Toxicology

Tested in 2 real MPSC questions across 1 year (20202020). See it in context on the interactive Concept Graph →

Years it was asked

Real questions that test this

'जर्नल ऑफ क्लिनिकल एण्डोक्राइनॉलॉजी' अॅण्ड मेटाबॉलिझम मध्ये प्रसिद्ध झालेले, ट्रायकलोसन हे रसायन आणि त्याच्या संपर्काचा हाडांची खनिज घनता तसेच हाडांच्या दिसूनपणाच्या यांच्यातील सहसंबंधाचा शोध घेणारे त्या प्रकारचे पहिलेच संशोधन आहे. साबण, टूलपेस्ट, हातसफाई साबण इत्यादी प्रकारच्या ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायकलोसनच्या संपर्कात येऊ शकते. तथापि ट्रायकलोसन व मानवी हाडांचे आरोग्य यांच्या संबंधाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. 'प्राण्यातील हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम करण्याची क्षमता ट्रायकलोसनमध्ये असण्याच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील अभ्यासातून झालेले आहे' असे ट्रायकलोसनच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकाने म्हटले आहे. The research published in the 'Journal of Clinical Endocrinology and Metabolism', is the first of its kinds to investigate the association between the chemical triclosan, exposure with bone mineral density and osteoporosis. A person can be exposed to triclosan via consumer products like soaps, toothpastes, sanitizers and other such products. However little is known about the relationship between triclosan and human bone health. Laboratory studies have demonstrated that triclosan may have potential to adversely affect the bone density in animals,' said one scientist studying effects of triclosan.

वरील माहितीवर आधारित सर्वात उचित निष्कर्ष निवडा. / Select the most appropriate conclusion based on above information.

a)प्राण्यांच्या हाडांवर होणाऱ्या ट्रायकलोसनच्या परिणामांबाबत फार थोडी माहिती उपलब्ध असली तरी वरील यादीत असलेल्या उत्पादनांत त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे.
b)मानवी हाडांवर नेमका कोणता परिणाम होतो हे माहित नसल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनांत ट्रायकलोसनचा वापर करण्याबाबत कोणताही प्रतिबंधक उपाय करण्याची आवश्यकता नाही.
c)ट्रायकलोसन आणि हाडांच्या खनिजांची घनता यांच्यातील सहसंबंध यांचा शोध पूर्वीच घेतला घेतलेला असल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनातील त्याच्या वापरापर बंदी घालणे आवश्यक आहे.
d)ट्रायकलोसनमध्ये प्राण्यांच्या हाडांच्या घनतेवर परिणाम करण्याच्या क्षमतेच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक काही अभ्यासातून दाखविले गेल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनात त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे.✓ Correct

Based on scientific studies showing potential negative impacts of triclosan on animal bone density, the most logical and cautious conclusion is to restrict its use in consumer products.