MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 70
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
खेळाडूंसाठी बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांच्या यादीत पालकात सापडणारे एकडायस्टेरॉन हे संजीवक समाविष्ट करण्याची शिफारस बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या, 'खेळाडूंच्या प्रदर्शनात वाढ होईल' या भाकिताच्या चाचणीसाठी त्यांनी अभ्यास केला. 'ज्या सहभागींना एकडायस्टेरॉनची मात्रा दिली त्यांच्या स्नायूंचे वस्तुमान लक्षणीय उच्च प्रमाणात वाढल्याचे', त्यांना या अभ्यासामध्ये आढळले.
स्वतःच्या लाडक्या ऑलिव्हसाठी दुष्ट लोकांना बडवण्यापूर्वी पोपेय पालकाचा हवाबंद डबा फोडून उघडत होता तेव्हा त्याचे वागणूक नक्कीच सरळ नव्हतं. आणि आता हे व्यंगारित्र्य कदाचित स्वतःचे अतिमानवी सामर्थ्य “उत्तेजकाचा” वापर करून मिळत होते असे आता जर्मनीचे वैज्ञानिक म्हणतात.
Scientists at the Berlin's Institute of Pharmacy have recommended that Ecdysterone, a hormone found in spinach, be included in the list of prohibited substances for athletes. Scientists conducted a study for testing their hypothesis, 'there would be an increase in performance of athletes.' They found, 'significantly higher increase in muscle mass observed in those participants who were dosed with Ecdysterone.'
Popeye was definitely into something when he ripped open cans of spinach before beating the bad guys for his beloved Olive. Now, scientists in Germany say that the cartoon character may well have been “doping” to get his superhuman strength.
वरील माहितीच्या आधारे खेळाूंसाठी एकडायस्टेरॉनचा वापर करण्यावर बंदी आणण्याची शिफारस करण्याचे सर्वात उचित कारण निवडा. Select the most of appropriate reason for recommending prohibition on the use of Ecdysterone for athletes.
a)व्यक्तीच्या स्नायूंच्या वस्तुमानात होणारी उच्च प्रमाणातील वाढ तिला अतिमानाचे सामर्थ्य मिळवून देते व ते त्याला वा तिला उत्कृष्ट प्रदर्शन (performance) करण्यास मदत करते.
b)स्नायूंच्या वस्तुमानात वाढ करत असल्याने एकडायस्टेरॉन, उत्तेजकाचे कार्य करते आणि अशा कोणत्याही स्वरूपाच्या ताकद वाढवणाऱ्या कोणत्याही उत्तेजकाच्या वापरावर खेळाडूंसाठी बंदी आहे.✓ Correct
c)स्नायूंच्या ताकदीत उच्च प्रमाणात होणारी वाढ खेळाडूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते.
d)पालकात एकडायस्टेरॉन असल्यामुळे तो खाण्याने व्यक्तीच्या स्नायूंच्या वस्तुमानात उच्च प्रमाणात वाढ होते.
Ecdysterone increases muscle mass and performance, functioning as a performance-enhancing substance, which is why it is banned for athletes under anti-doping regulations.