एकविसाव्या शतकात पर्यावरणाचा प्रश्न काय स्वरूपात असेल ? हा विचार करणे, एकतर अगदी सोप आहे किंवा अतिशय अवघड आहे. हे वाक्य विरोधाभासाचे उत्तम उदाहरण आहे, असे आपल्याला वाटेल. पण ते पूर्ण विचारांती लिहिलेले वाक्य आहे. पर्यावरणाचा प्रश्न हा tasa मानवसापेक्ष आहे, म्हणजे तो आपल्याला वाटतो, म्हणून आहे. पृथ्वीचा इतिहास बघितला तर मी काय म्हणतो, हे लक्षात येईल. पृथ्वीचे जे अनेक कालखंड होते, त्यामध्ये लक्षवधी वर्षे नांदणारे सजीव निर्माण होत होते. ते प्राणी कोट्यावधी वर्षे पृथ्वीवर नांदत होते आणि कालांतराने नष्ट होत होते. अगदी सुरवातीच्या काळात हे सजीव साग़रात वाढ्त होते. क्रिटेशियस कालखंडात सजीव हळूहळू जमिनीवर आले. त्यांची शरीर रचना जटील बनत गेली. या काळात ट्रायलोबाईट नावाचे काही प्राणी होते. त्या प्राण्यांना भरपूर सागरात उपलब्ध होता. पण काही कोटी वर्षे पृथ्वीवर वावरल्यानंतर, हे प्राणी नामशेष झाले. एवढच नव्हे तर, त्यांच्या बरोबर इतर बरेच सजीवही नाहीसे झाले.
नंतरच्या काळात ही, बरेच प्राणी नाहीसे झालेले पहायास मिळते. डायनोसॉर वर्गीय प्राण्यांनी जवळपास 16 कोटी वर्षे पृथ्वीवर निरंकुश सत्ता गाजवली, असे म्हणता येईल. आज ते अस्तित्वात नाहीत. एवढेच नव्हे तर, त्या काळातली अनेक वनस्पतीही आज अस्तित्वात नाहीत. यानंतरच्या काळात मॅस्टेडॉन, खड़गदंती इत्यादी प्राणीही नामशेष झाले. ते प्राणी तर पृथ्वीवर मानव अस्तित्वात आल्यानंतरच्या काळातही अस्तित्वात होते. मात्र त्यांचा नामशेष होण्यासाठी मानव कारणीभूत ठरलेला नाही, हे लक्षात ठेवायला हवे. मात्र हे सर्व सजीव नामशेष झाले, ते त्या काळातील पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे, हे सर्वजण मान्य करतात. म्हणजे विशिष्ट परिस्थितीत कोणत्या तरी नैसर्गिक कारणाने पर्यावरणातील आदर्श परिस्थितीत एकाएकी बदल होऊन बरेच प्राणी नाहीसे झालेले दिसतात. हे बरेचदा घडलेले आहे. हिमयुगानंतर काही वेळा प्राण्यांच्या किंवा सजीवांच्या नव्या जाती निर्माण झाल्या, असे आढळून येते. याचप्रमाणे ज्वालामुखी, भूकंप, यानंतर स्थानिक पर्यावरणत बदल घडून स्थानिक परिस्थिती बदलल्याची उदाहरणे दिसतात.
पर्यावरणाचा एक प्रश्न गेल्या शंभर वर्षातला म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतरचा आहे. औद्योगिक क्रांतीमुळे आपण निसर्गांची लूट करू शक्शतो, हे गेल्या शंभर वर्षांत आपल्या लक्षात आले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपल्याला अनेक गोष्टींची प्रचंड मोठ्या प्रमाणात गरज भासली. या बरोबरच वैद्यकिय ज्ञानही वाढले. लोकसंख्येला तोंड द्यायचे तर जंगलोंतोड अनिवार्य होती. शहरे व खेडी पसरली. यामुळे जंगलाचा ऱ्हास झाला. हे आता सर्वच पर्यावरण अभ्यासकांना माहीत आहे.
आपण पूर्वीचे दाखले घेतो, त्यात वाढती संख्या हे प्रजाती विनाशाचं कारण गृहीत धरणे जाते. पण कुठेही इतक्या झपाट्याने म्हणजे मानव जात ज्या झपाट्याने वाढली आहे, त्या झपाट्याने प्राणीजात वाढल्याचे उदाहरण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या प्राणिजातींनी वातावरण प्रदूषित करून पर्यावरणान प्रश्न निर्माण केल्याचेही दाखले अजून मिळालेले नाहीत. या उलट निसर्गात 'जगा आणि जगू द्या' हेच तत्व वाढलेले दिसते. कारण नैसर्गिक अवस्थेतले प्राणी हे एका अन्नसाखळीतले दुवे असतात आणि त्यांची अन्न साहाय्याची पद्धत म्हणजे आपले भक्ष जणू देणे त्याला सुखेने वाढू देणे. भक्ष्याचं प्रमाण काही कारणांने कमी झाले तर, उदाहरण द्यायचे तर, गव्त कमी झाले तर निसर्गातः चरण व ससे कमी होतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर जगणारे पशुपक्षो आपले प्रजोत्पादन घटवतात, कमी करतात. तेव्हा हे जूने दाखले आणि आपण करत असलेली पर्यावरणाची हानी यांच्यामध्ये तफावत आहे, हे लक्षात यायला हरकत नाही.
कोणत्या कारणामुळे पृथ्वीवरील मॅस्टेडॉन, खडगदंती, इ. प्राणी नामशेष झाले ?
Due to what reason did the mastodon, tusks, etc. animals on the earth became extinct ?
(A)अतिरेकी मानवी हस्तक्षेप / Excessive human intervention
(B)पर्यावरणीय समतोल ढासळल्यामुळे / Due to the disruption of the ecological balance
(C)प्राण्यांच्या शिकारीमुळे / Due to animal predation
(D)वरीलपैकी सर्व / All the above
1)अ आणि ब बरोबर आहेत / A and B are correct
2)ब आणि क बरोबर आहेत / Both B and C are correct
3)फक्त ब बरोबर आहे / Only B is correct✓ Correct
4)ड बरोबर आहे / D is correct
The passage says humans were not the cause of these extinctions; everyone agrees the animals died out because the balance of the environment at that time was disturbed. So only B is correct.
MPSC has asked 44 Reading Comprehension questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.