MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2013 CSAT — Question 79

The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →

तुमच्या मित्राने त्याचे दुकान एका दुकानदाराला भाड्याने दिले आणि त्या दुकानदाराने मागील एक वर्षापासून भाडे दिलेले नाही व आता तो दुकान रिकामेही करण्यास नकार देत आहे. दुकानदाराने तुमच्या मित्रास दुकान विकत देण्याची मागणी केली आहे परंतु दुकानदाराची खरेदी किंमत बाजार भावाच्या 50% आहे. दुकानदाराने त्याच्या ओळखीचा वापर करून पोलिसाकडे जाऊ नये म्हणून तुमच्या मित्राला धमकावले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एक पोलीस अधिकारी म्हणून कोणता सल्ला द्याल? Your friend has rented his shop to a shopkeeper and shopkeeper has not paid his rent for the last one year and now refuses to vacate his shop. Shopkeeper has offered to purchase that shop from him but only at 50% of the present market value. Shopkeeper uses his contacts and has threatened him of dire consequences if he lodges a police complaint. What kind of advice would you give to your friend as a police officer ?

a)(1) पोलिसाकडे दुकानदाराच्या विरोधात तक्रार नोंदविणे. / Lodge a complaint against the shopkeeper with the police.✓ Correct
b)(2) दुकानदाराने सुचविलेल्या खरेदी किंमतीत वाढ करावयास सांगणे. / Negotiate with the shopkeeper for a higher price and sell it.
c)(3) तुमच्या अधिकाराचा वापर करून दुकानदारास धमकी द्याल. / Use your power for threatening the shopkeeper.
d)(4) तिसऱ्या व्यक्तीला दुकान विकण्याचा प्रयत्न करावा जेथे किंमत बाजार भावापेक्षा थोडी कमी परंतु दुकानदाराच्या खरेदी किंमतीपेक्षा अधिक आहे. / Try to sell the shop to a 3rd party at a price slightly less than the market price but higher than the offer of the shopkeeper.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 2.5 marks(2) 1 marks(3) 0 marks(4) 1.5 marks

As a police officer, filing a formal complaint against illegal occupation, non-payment of rent, and criminal intimidation is the lawful and correct course of action.

🏛️ The Maharashtra angle

Addresses common landlord-tenant property disputes prevalent in urban Maharashtra.

MPSC has asked 44 Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

तुम्ही अशा भागात वसतीला आहात की जेथे पुढारी आणि गुंड यांनी संबंधित नागरी अधिकाऱ्यावर दबाव आणून अवैध बांधकाम केले आहे व फेरीवाले बसवले आहेत. जेव्हा तक्रार दाखल करण्याकरता, तुम्ही हे काम पाहात असलेल्या अधिकाऱ्याकडे गेलात तेव्हा तिने तुम्हाला सांगितले की तिला कोणतेही संरक्षण नसल्याने ती या लोकांविरोधात कोणतीही कृती करू शकणार नाही. तिने तुम्हाला असेही सांगितले की बहुधा शासन अशा अवैध कामांचे कायद्यात बदल करून त्यांचे कायदेशीर कामांत रूपांतर करते. तुम्ही यावर, You are residing in the area where many leaders and goons are engaged in illegal constructions and hawking by pressurising civil officers. When you went to lodge a complaint with the officer in charge she told you that she is not in a position to take any action for want of any protection against these people. She also tells you that government usually makes such types of illegal work legal by making necessary changes in the laws. You will,अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करणाऱ्या विभागाचे प्रमुख म्हणून तुम्ही काम करत आहात. एका गटाने, तुमचा कार्य अहवाल तयार करणाऱ्या वरिष्ठकडे, विशिष्ट व्यक्तीला ते राहत असलेल्या इमारतीत, ती आरक्षित गटातील असल्यामुळे रहाण्यासाठी जागा देऊ नये अशी विनंती केली आहे. अप्रत्यक्षपणे तुमच्या वरिष्ठने तुम्हाला त्यांची विनंती मान्य करण्याची सूचना केली आहे. मात्र संबंधित निर्णयाच्या परिणामाला पूर्णपणे तुम्हीच जबाबदार असाल असा इशाराही दिला आहे. पुढच्या काही महिन्यांत तुमची बढती अपेक्षित आहे. दिलेल्या परिस्थितीत दिलेल्या कृती पर्यायातून तुमची निवड कोणती असेल ?वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थीना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधी निर्णय घ्यायला साहाय्य करण्याचा कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे नसलेली चारचाकी आढळली. प्रशिक्षणार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशीलात जाऊन चौकशी केली. तो स्वतःच संबंधित गाडीचा मालिक आहे आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. स्वतःच्या दाव्यासंबंधी सर्व दस्तऐवजी त्याने दाखवले. प्रशिक्षणार्थीने त्याला बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फर्मावले. मी जाणूनबुजून नियम मोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईन असे चालक गवाया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे. तुम्ही सुचवाल;प्रस्तुत उताऱ्यातील 'कायद्याचे राज्य' या संकल्पनेत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा/घटकांचा समावेश आहे ? / The term 'Rule of Law' used in this paragraph means which of the following element/elements ?
Didn't find what you were looking for?