MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2016 CSAT — Question 79

The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →

पाच दिवसांच्या सुटीत तुम्ही दुर्गम ग्रामीण ठिकाणी राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी आला आहात. भटकत असताना तुम्हाला वाटेत त्या भागातील विधानसभा सदस्याच्या व्यवस्थापनाखाली चालणारी निवासी आश्रम शाळा लागली. तुमचा मित्र हा विधानसभा सदस्य प्रमुख असलेल्या अन्य संस्थेचा कर्मचारी आहे. ही शाळा मुख्य रस्त्यापासून तसेच गावच्या वस्तीपासून दूर आहे. तुम्ही शाळेच्या आवारात गेलात आणि तुम्हाला शाळेच्या ओट्यावर सहा मुले बसलेली दिसली. इतर सर्व खोल्यांना ताळी लावली होती व आसपास कोणीही नव्हते. चौकशी केल्यावर तुम्हाला समजले की ती त्या शाळेची मुले असून ती त्यांच्या पालकांना त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी वाट पाहत आहेत. ती मुले अन्नाशिवाय दोन दिवस आहेत. ही मुले लाजाळू असलेल्या कोरकू समाजातील असल्याने गावकऱ्यांना भेटून त्यांच्यात मदत करण्याची विनंती करण्याचे धाडस नाही. तुमचा मित्र स्वतःच्या नौकरीची काळजी असल्याने तुम्हाला या मुलांना त्यांच्या नशिबावर सोडण्याची आणि आवारातून त्वरित बाहेर पडण्याची विनंती करत आहे. तुम्ही,

तुम्ही काय करणार?

a)गावकर्‍यांना बोलावून या मुलांची काळजी घेण्याची त्यांना विनंती कराल आणि स्वतःला व मित्राला गुंतवून न घेता तरुणांच्या गटाला यामधील काही व्यक्तींना बोलावून या घटनेची कथा बनवण्यात पुढाकार घ्यायला मार्गदर्शन कराल.✓ Correct
b)मित्राच्या नौकरीवर कोणत्याही स्वरूपात गदा येऊ नये म्हणून गावकर्‍यांना बोलावून त्यांना या मुलांची दशा पाहण्यास सांगून मुलांचे पालक येईपर्यंत त्याची काळजी घेण्याची विनंती कराल.
c)तुम्हाला सुटीचा आनंद लुटायचा असल्याने तुम्ही गावकर्‍यांशी बोलून व त्यांना आवश्यक रक्कम सोपवून मुलांना अन्न देण्याची विनंती करून ही घटना विसरून जाल.
d)गावकर्‍यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामार्फत सर्व शालेय कर्मचार्‍यांना मुलांचे पालक त्यांना घेऊन जाईपर्यंत त्यांची काळजी घेण्यासाठी कामावर ताबडतोब रुजू व्हायला लावाल.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 2.5 marks(2) 1 marks(3) 1.5 marks(4) 0 marks

In an ethical dilemma involving children's welfare during a vacation or site visit, ensuring immediate safety and proper care through responsible local authorities is paramount.

MPSC has asked 44 Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?