MPSC Rajyaseva 2024 CSAT — Question 17
The correct answer with a full explanation. Practice Reading Comprehension questions as a quiz →
नैतिक तत्त्वज्ञान ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. ही शाखा कोणती गोष्ट योग्य आणि कोणती अयोग्य याचा काळजीपूर्वक विचार करते. लोकांनी इतरांबरोबर आपले जीवन कसे जगावे याचे मूल्यमापन करताना हा शाखा नैतिक स्वरूपाचे ज्ञान देते. नैतिक तत्त्वज्ञानाच्या तीन शाखा आहेत. अधिनीतीशास्त्र ही पहिली शाखा. ही शाखा नीतीशास्त्राच्या प्रश्नांचा शोध घेते जसे की, नैतिकता म्हणजे काय ? न्याय म्हणजे काय ? सत्याचे अस्तित्व असते काय ? मी माझ्या विश्वास किंवा श्रद्धेचा इतरांच्या विश्वास किंवा श्रद्धेचा, विरोधी मतांबाबत कसा न्यायनिर्णय करू शकतो ? मानदंडक नीतीशास्त्र हे नैतिक तत्त्वज्ञानाची दुसरी शाखा आहे. ह्या शाखेत आपण काय करायला हवे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळते. मानदंडक नीतीशास्त्र हे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्यावर प्रकाश टाकून त्याची रूपरेषा तयार करते. दायित्व नीतीशास्त्र उपयुक्ततावाद आणि सद्गुण नीतीशास्त्र ह्या तीन रूपरेषा दिसून येतात. उपयोजित नीतीशास्त्र ही नीतीशास्त्राची शेवटची शाखा आहे. ही शाखा नैतिकदृष्ट्या महत्त्वाच्या विशिष्ट आणि व्यावहारिक मुद्द्यांना संबोधित करते. उपयोजित नीतीशास्त्र ही सर्वसामान्य माणसांना दैनंदिन जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्या नैतिक आव्हानांना संबोधित करते. जसे की, मित्राला मदत करण्यासाठी खोटे बोलावे का ? म्हणून आपला नैतिक दृष्टिकोन हा मोठाच प्रश्न आहे. व्यावहारिक रूपरेषा किंवा विशिष्ट संभ्रमात्मक अवस्थेत मदत म्हणून नैतिक तत्त्वज्ञान हे आपल्याला नैतिक जीवन जगणे आणि स्वतःचे परीक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून उपयोग करू शकते. मानदंडक नीतीशास्त्रांमधील दायित्व नीतीशास्त्र हा एक नैतिक तत्त्वज्ञानात्मक सिद्धांत आहे. ज्यामध्ये स्पष्ट निर्धारित नियमांच्या आधारे आपली कृती चांगली किंवा वाईट ठरते. इम्यानुअल कांत ह्या तत्त्वांचा नैतिक कृती ह्या वैश्विक नैतिक नियमांचे अनुपालन करतात ह्यावर विश्वास होता. जसे की खोटे बोलू नका, चोरी करू नका, फसवू नका. नीतीशास्त्र सहजपणे लागू करण्यासाठी किंवा उपयोगात आणण्यासाठी लोकांनी नियमांचे पालन करणे आणि आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते. हा दृष्टिकोन आपल्याला नैसर्गिक अंतर्ज्ञानांची चांगल्या रीतीने जुळवून येतो. परिणाम बादामध्ये जसे कृतीचा शेवट काय आहे हे लक्षात घेऊन न्याय केला जातो तसे दायित्व नीतीशास्त्रात नसते. यावेळी परिस्थितीनुसार त्याची किंमत किंवा फायदे मोजले जात नाहीत. यामुळे व्यक्तिनिष्ठता आणि अनिश्चितता टाळून तुम्हाला केवळ नियमांचे पालन कराव्याचे असते, म्हणून नियमांचे पालन करून नीतीशास्त्राचे उपयोजन करणे सोपे जाते. परंतु चांगले काय आणि वाईट काय हे ठरविताना परिणामाच्या शक्यता नकाराने असाही याचा अर्थ होतो.
या प्रश्नाचा पूर्ण मजकूर व पर्याय वरील प्रतिमेत आहेत. / The full question and options are in the image above.
1)(1)
2)(2)
3)(3)✓ Correct
4)(4)
The passage gives Kant's universal moral laws as rules like 'don't lie, don't steal, don't cheat', so 'don't cheat'.
MPSC has asked 91 Reading Comprehension questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
या माहितीच्या आधारे केलेल्या पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य नाही?आजच्या जगाबाबत खालील कोणते विधान योग्य आहे ?
Which of the statements given below about todays world is correct ?पुढील कोणते विधान अयोग्य नाही.
Which of the following statements is not incorrect ?जगातील हुकूमशहा क्रुरतेपेक्षा सहानुभूतीमुळे जास्त यशस्वी होऊ शकतात कारण -
Autocrats will be able to rule more successfully with the help of sympathy than with cruelty because :
Didn't find what you were looking for?