Imperialism is a History concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions (2014, 2015, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे/आहेत ?
Which of the statements given below is/are correct ?
(a)जर्मनीला भांडवल व पक्का माल हवा होता. / Germany wanted "Capital and finished goods".
(b)साम्यवादाअगोदर साम्राज्यवाद निद्रीस्त होता. / When Communism was born imperialism was fast asleep ?
1)फक्त (a) / Only (a)
2)फक्त (b) / Only (b)
3)दोन्ही (a) आणि (b) / Both (a) and (b)
4)(a) व (b) दोन्हीही नाही / Neither (a) nor (b)✓ Correct
Neither statement is correct as historical analyses show imperialism and communism have different definitions and chronological developments.
हे सारं बद्धर्शी ग्रेटब्रिटन आणि त्याच्या वसाहतीमधलं चित्र म्हणता येईल. पण युरोपात औद्योगिक क्रांती फक्त ब्रिटनमध्ये झाली असं नव्हे तर ती फ्रान्स, हॉलंड, जर्मनी अशी सगळीकडे झाली. सगळीकडे ती एकच वेळी झाली असंही नाही. इंग्रजांच्या जशा वसाहती होत्या तशाच फ्रेंच व डच लोकांच्याही होत्या. जर्मनीच्या फार कमी. स्पेन आणि पोर्तुगालच्याही होत्या पण हे दोन्ही देश सगळयात आधी वसाहती करून नंतर स्वतः धार्मिक भानगडीत वेगवेगळ्या रस्त्यानं गुंत गेले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांच्या वसाहती मोठ्या होत्या. फ्रेंचांच्या, डचांच्या लहान होत्या; तरीही होत्या. जर्मनींत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेने अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडे फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर इंग्रजांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं. गेल्या शतकातल्या दोन्ही महायुद्धांना ही व्यापारी गरजांची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. या महायुद्धामुळे अपरिमित मानवी संहार, भीषण हानी होऊन युरोपातील जिंकणारे व हरणारे असे सारेच दुबळे होऊन गेले. या महायुद्धाची सगळ्यात कमी झळ पोहोचलेली अमेरिकेची संयुक्त संथाने-ज्यांचा उल्लेख सर्वसाधारणपणे आपण अमेरीका असा करतो ती-आणि ज्यांना सगळ्यात जास्त झळ बसली तो रशिया-ज्यात बाकी सोव्हियत प्रजासत्ताके होती-अशा दोन महासत्ता युद्धानंतर उदयाला आल्या.
बाजारपेठांची उपलब्धता कोणत्या क्रांतीसाठी आवश्यक असते ?
1)धार्मिक
2)सांस्कृतिक
3)सामाजिक
4)औद्योगिक✓ Correct
Mass production through machines requires widespread markets to sell the manufactured goods, making the availability of markets a driving factor for the Industrial Revolution.
आंतरराष्ट्रीय राजकारणाचे शास्त्र बाल्यावस्थेत आहे. भूतकाळात, म्हणजे 1914 च्या सुमारास आंतरराष्ट्रीय संबंध त्यामध्ये व्यावसायिक दृष्टया गुंतलेल्या लोकांचा मामला होता. लोकशाही देशांमध्ये परंपरेने परराष्ट्र धोरण हे पक्षीय राजकारणाच्या व्याप्तीच्या पलीकडले मानले गेले; आणि परराष्ट्र खात्यांच्या गुढ व्यवहारांवर बारिक नियंत्रण ठेवण्यास आपण सक्षम आहोत असे प्रातिनिधिक संस्थांना वाटत नव्हते. ब्रिटीश नाविक दलाने आपल्या संभाव्य शत्रुंच्या संदर्भात असलेले वर्चस्व जे त्या काळात आवश्यक मानले जावयाचे काही काळासाठी जरी गमावले, किंवा परंपरेने ब्रिटीशांचे हित संबंध असलेल्या वा तसे मानले गेलेल्या प्रदेशात युद्ध सुरू झाले तर ब्रिटीश जनमत सहज प्रक्षोभित होत असे. सक्तीची लष्कर भरती आणि वर्षानुवर्षे परकीय आक्रमणाची भीती यामुळे युरोपच्या खंडीय भागात लोकांमध्ये एक सर्वसाधारण, सततची आणि सहज अशी आंतरराष्ट्रीय प्रश्नांसंबंधीची जाणीव होती. परंतु या जाणीवेची अभिव्यक्ती मुख्यतः कामगार चळवळीच्या माध्यमातून होत असे ज्यायोगे कामगार चळवळीने वेळोवेळी पोथीनिष्ठ असे युद्धविरोधी ठराव पारित केले. अध्यक्षांनी सिनेटच्या (वरिष्ठ सभागृह) सल्ल्याने आणि मान्यतेने करार पूर्ण करावेत अशी अद्वितीय तरतूद अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये होती. परंतु या अपवादात्मक तरतूदीला व्यापक महत्त्व प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने अमेरिकेचे परराष्ट्र संबंध अत्यंत तोकडे होते. राजनयाच्या रंगतदार पैलूंना मात्र बातमीचे मूल्य होते. परंतु विद्यापीठात काय किंवा बुद्धीवाद्यांच्या व्यापक वर्तुळांमध्ये काय, वर्तमान आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सुसंबद्ध अभ्यास केला जात नव्हता. युद्ध हे अजूनही मुख्यतः सैनिकांचे काम मानले जात होते; आणि त्या ओघानेच आंतरराष्ट्रीय राजकारण हे राजनैतिक अधिकाऱ्यांचे काम मानले गेले. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संचालन व्यावसायिकांच्या हातून काढून घ्यावे किंवा ते काय करीत आहेत त्याकडे गंभीरपणे आणि पद्धतशीरपणे लक्ष द्यावे अशी सर्वसाधारण इच्छाही नव्हती.
Question number 26 to 30:
The beginnings of a science
The science of international politics is in its infancy. Down to 1914, the conduct of international relations was the concern of persons professionally engaged in it. In democratic countries, foreign policy was traditionally regarded as outside the scope of party politics; and the representative organs did not feel themselves competent to exercise any close control over the mysterious operations of foreign offices. In Great Britain, public opinion was readily aroused if war occurred in any region traditionally regarded as a sphere of British interest, or if the British navy momentarily ceased to possess that margin of superiority over potential rivals which was then deemed essential. In continental Europe, conscription and the chronic fear of foreign invasion had created a more general and continuous popular awareness of international problems. But this awareness found expression mainly in the labour movement, which from time to time passed somewhat academic resolutions against war. The Constitution of the United States of America contained the unique provision that treaties were concluded by the President "by and with the advice and consent of the Senate". But the foreign relations of the United States seemed too parochial to lend any wider significance to this exception. The more picturesque aspects of diplomacy had a certain news value. But nowhere, whether in universities or in wider intellectual circles, was there organized study of current international affairs. War was still regarded mainly as the business of soldiers; and the corollary of this was that international politics, was the business of diplomats. There was no general desire to take the conduct of international affairs out of the hands of the professionals or even to pay serious and systematic attention to what they were doing.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये परराष्ट्र धोरण हे __________ क्षेत्र होते.
In the first two decades of the 20th century, foreign policy was a realm of
a)राजकीय पक्षांचे / Political parties
b)विधि मंडळांचे / Legislature
c)सैनिकांचे / Soldiers
d)परराष्ट्र खात्यांचे / Foreign offices✓ Correct
In the early 20th century, foreign policy decisions were heavily guarded secrets handled strictly by diplomatic and foreign offices, away from public or legislative debate.
सैफूभाईंच्या मते साम्यवाद काय सांगतो ?
According to Saifubhai, what does Communism profess ?
(a)नफ्याचा लोभ सोडावा. / Give up the lust for profit.
(b)लोकांना भरपूर वेतन द्यावे. / People should be paid generous wages.
(c)उत्पादनाच्या साधनांवर एकत्रित मालकी असावी. / Means of production should be commonly owned.
(d)प्रत्येकाकडून त्याच्या गरजेनुसार काम करून घ्यावे. / Everyone should be made to work according to one's need.
1)(a), (b), (c)
2)(a), (c), (d)
3)(a), (b), (d)
4)(a), (c)✓ Correct
According to Saifubhai's perspective on communism, it professes giving up the lust for profit and having common ownership over the means of production.