MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 21
The correct answer with a full explanation. Practice Reading Comprehension questions as a quiz →
‘छे!’ हाही असाच एकाक्षरी; परंतु अर्थाचे डोंगर पोतात सामावणारा शब्द. आंत्यंतिक आश्चर्यापासून आंत्यंतिक कृतज्ञतेपर्यंत, आंत्यंतिक आनंदापासून तो पराकाष्ठेच्या तुच्छतेपर्यंत कितीतरी परस्परविरोधी प्रतिक्रिया या एकाच एकाक्षरी उद्गारातून आपण प्रकट करत असतो. ‘परवा भीमसेनजींची मैफल ऐकली. छे ! कमाल केली पंडितजींनी त्या दिवशी.’ या वाक्यातला ‘छे !’ कौतुकादिर दाखवतो ‘छे! कसलं घाणेरडं पिक्चर दाखवंस तू मला. वैताग आला ते बघताना !’ या वाक्यातला ‘छे !’ तुच्छता, तिरस्कार यांचा सूचक असतो. ‘छे! आम्ही का ती मुलगी पसंद करणार आमच्या मुलासाठी ? काहीतरीच काय ?’ या वाक्यातला ‘छे!’ बोलणाऱ्याच्या किंवा बोलणाऱ्याच्या अहंकारी आढ्यतेमधून उमटलेला असतो. ‘छे! छे!! कहर झाला अगदी! हसून हसून माझं पोट दुखायला लागलं,’ ही एखाद्या सुंदर, विनोद नाटकाबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते.
असे कितीतरी एकाक्षरी शब्द. ‘हं’, ‘रे’, ‘हो’, ‘छी’ हेही त्याच्याच मालिकेतले. मात्र, या शब्दांच्या उच्चाराबरोबर स्वरांचा चढउतार, त्यातला सूक्ष्म फरक, चेहऱ्यावारचे भाव हे ध्यानी घेतले नाहीत, तर त्यांचा खरा अर्थ समजणार नाही.
जगातील साऱ्या जिज्ञासासे, ज्ञानाचे आणि उत्कट जाणिवेचे मूळ 'का?' या एका शब्दात सामावले आहे. कारण
(a)'का?' शब्द नसता तर सारी प्रगती झपाट्याने झाली असती.
(b)'का?' ची भाषा कधी कधी लहान-थोर सर्वांना उमगत नाही.
(c)'का?' अर्थहीन शब्द आहे.
(d)'का?' चा अर्थपूर्ण आवाका मोठा आहे.
1)अ फक्त
2)ब आणि ड फक्त✓ Correct
3)क आणि अ फक्त
4)क फक्त
उताऱ्याच्या आधारे 'का?' या शब्दाचा आवाका मोठा आहे कारण त्यातून जिज्ञासा आणि ज्ञानाचे मूळ प्रकट होते, तसेच त्याची भाषा सर्वांना सहज उमगत नाही.
MPSC has asked 44 Reading Comprehension questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
या माहितीच्या आधारे केलेल्या पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य नाही?आजच्या जगाबाबत खालील कोणते विधान योग्य आहे ?
Which of the statements given below about todays world is correct ?पुढील कोणते विधान अयोग्य नाही.
Which of the following statements is not incorrect ?जगातील हुकूमशहा क्रुरतेपेक्षा सहानुभूतीमुळे जास्त यशस्वी होऊ शकतात कारण -
Autocrats will be able to rule more successfully with the help of sympathy than with cruelty because :
Didn't find what you were looking for?