Every Ethics & Decision Making question MPSC has actually asked in Other, 2015–2025 — 18 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.
तुम्ही महानगरपालिकेकेचे वरिष्ठ अधिकारी आहात. म.न.पा. हद्दी मध्ये प्रतिष्ठित हॉस्पीटलमध्ये डिलीव्हर्री साठी आलेल्या महिलेला रुग्णालयात डिपॉझीट भरले नाही म्हणून ॲडमीट करून घेतले जात नाही, तुम्हाला समाज माध्यमांद्वारे ही बातमी कळते, दुर्दैवाने या महिलेचा उपचाराअभावी मृत्यु होतो. अधिकारी म्हणून तुम्ही काय कराल ?
1)रुग्णालय प्रशासनावर त्वरीत कारवाई कराल. / Take action against hospital administration.
2)रुग्णालय बंद करण्याचे आदेश दयाल. / Give order to close the hospital.
3)भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून सर्व हॉस्पीटलला आदेश काढाल की अनामत रक्कम न घेताच आपत्कालीन उपचार दयावे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई कराल. / Issue orders to all hospitals to give immediate medical treatment and that no advance deposit should be taken during admission in emergencies, to avoid such incidents in future. If disobeyed, take legal action.✓ Correct
4)रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व विभाग प्रमुखांवर चौकशी सुरू करून निष्कर्षानुसार कार्यवाही कराल. / Initiate an inquiry against the concerned doctor and department head of the hospital and, based on the findings, take appropriate action.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 1 marks(2) 0 marks(3) 2.5 marks(4) 1.5 marks
To prevent such tragedies permanently, a senior official must issue strict orders to all hospitals mandating immediate emergency treatment without advance deposits, backed by legal action for violations.
🏛️ The Maharashtra angle
Relevant to public health administration under state municipal corporations in Maharashtra.
मंजूरीसाठी पाच खाजगी निवासी आश्रम शाळांचे सर्वेक्षण तुम्हाला करायचे आहे. या आश्रमशाळांचे अस्तित्व, त्यांच्या इमारती, त्यातील सर्व सुविधा, पटसंख्या व प्रत्यक्षनातील दैनंदिन उपस्थिती, नियमानुसार शिक्षकांच्या नेमणुका इत्यादींची परिस्थिती पाहून तुम्ही अहवाल देणार आहात. एका मुलींच्या शाळेत राहण्याची सुविधा फारच निकृष्ट होती असे तुमच्या लक्षात आले. बारकाईने पाहताना तुम्हाला त्या इमारतीत सर्व विद्यार्थीनी खांद्यात वाकून चालताना दिसल्या. एकाही मुलीला छाताखाली ताठ उभे राहता येत नव्हते. तुम्ही कोणते निर्णय घ्याल ?
You want to survey five private residential Ashram Schools for approval. You are going to report on the existence of these Ashram Schools, their buildings, all their facilities, number of students and actual daily attendance, appointment of teachers as per rules, etc. You noticed that the accommodation facilities was very poor in one girl's school. You noticed that all the girls were walking with their shoulders bent. None of the girls could stand upright under the roof. What decision will you take ?
a)दुर्गम भागातील या गरीब मुलींना निवासी शाळेत शिक्षण घ्यायला मिळते तेच पुरेसे आहे विचार करून शाळेला मंजुरी देईन.
b)'पुरेशा निधी अभावी या भागात शाळा चालवणे कठीण आहे' वस्तुस्थिती लक्षात घेऊन तुम्ही शाळेच्या मंजुरीसाठी शिफारस करेन पण त्याच वेळी शक्य तितक्या लवकर सुविधांनी सज्ज इमारत बांधल्यासच यापुढे मंजुरी मिळेल असे स्पष्ट करेल.
c)सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेल.
d)सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेल. पण त्याच वेळी संबंधित मुलींच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची व्यवस्था करण्यात संचालकांना आवश्यक ते साहाय्य करें.✓ Correct
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 0 marks(2) 1 marks(3) 1.5 marks(4) 2.5 marks
The school's recognition must be cancelled due to extremely poor infrastructure, but necessary assistance should be provided to ensure students' education is not disrupted.
🏛️ The Maharashtra angle
Relevant to Ashram School inspections conducted by tribal development departments in Maharashtra.
नैतिक तत्त्वज्ञान ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. ही शाखा कोणती गोष्ट योग्य आणि कोणती अयोग्य याचा काळजीपूर्वक विचार करते. लोकांनी इतरांबरोबर आपले जीवन कसे जगावे याचे मूल्यमापन करताना हा शाखा नैतिक स्वरूपाचे ज्ञान देते. नैतिक तत्त्वज्ञानाच्या तीन शाखा आहेत. अधिनीतीशास्त्र ही पहिली शाखा. ही शाखा नीतीशास्त्राच्या प्रश्नांचा शोध घेते जसे की, नैतिकता म्हणजे काय ? न्याय म्हणजे काय ? सत्याचे अस्तित्व असते काय ? मी माझ्या विश्वास किंवा श्रद्धेचा इतरांच्या विश्वास किंवा श्रद्धेचा, विरोधी मतांबाबत कसा न्यायनिर्णय करू शकतो ? मानदंडक नीतीशास्त्र हे नैतिक तत्त्वज्ञानाची दुसरी शाखा आहे. ह्या शाखेत आपण काय करायला हवे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळते. मानदंडक नीतीशास्त्र हे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्यावर प्रकाश टाकून त्याची रूपरेषा तयार करते. दायित्व नीतीशास्त्र उपयुक्ततावाद आणि सद्गुण नीतीशास्त्र ह्या तीन रूपरेषा दिसून येतात. उपयोजित नीतीशास्त्र ही नीतीशास्त्राची शेवटची शाखा आहे. ही शाखा नैतिकदृष्ट्या महत्त्वाच्या विशिष्ट आणि व्यावहारिक मुद्द्यांना संबोधित करते. उपयोजित नीतीशास्त्र ही सर्वसामान्य माणसांना दैनंदिन जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्या नैतिक आव्हानांना संबोधित करते. जसे की, मित्राला मदत करण्यासाठी खोटे बोलावे का ? म्हणून आपला नैतिक दृष्टिकोन हा मोठाच प्रश्न आहे. व्यावहारिक रूपरेषा किंवा विशिष्ट संभ्रमात्मक अवस्थेत मदत म्हणून नैतिक तत्त्वज्ञान हे आपल्याला नैतिक जीवन जगणे आणि स्वतःचे परीक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून उपयोग करू शकते. मानदंडक नीतीशास्त्रांमधील दायित्व नीतीशास्त्र हा एक नैतिक तत्त्वज्ञानात्मक सिद्धांत आहे. ज्यामध्ये स्पष्ट निर्धारित नियमांच्या आधारे आपली कृती चांगली किंवा वाईट ठरते. इम्यानुअल कांत ह्या तत्त्वांचा नैतिक कृती ह्या वैश्विक नैतिक नियमांचे अनुपालन करतात ह्यावर विश्वास होता. जसे की खोटे बोलू नका, चोरी करू नका, फसवू नका. नीतीशास्त्र सहजपणे लागू करण्यासाठी किंवा उपयोगात आणण्यासाठी लोकांनी नियमांचे पालन करणे आणि आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते. हा दृष्टिकोन आपल्याला नैसर्गिक अंतर्ज्ञानांची चांगल्या रीतीने जुळवून येतो. परिणाम बादामध्ये जसे कृतीचा शेवट काय आहे हे लक्षात घेऊन न्याय केला जातो तसे दायित्व नीतीशास्त्रात नसते. यावेळी परिस्थितीनुसार त्याची किंमत किंवा फायदे मोजले जात नाहीत. यामुळे व्यक्तिनिष्ठता आणि अनिश्चितता टाळून तुम्हाला केवळ नियमांचे पालन कराव्याचे असते, म्हणून नियमांचे पालन करून नीतीशास्त्राचे उपयोजन करणे सोपे जाते. परंतु चांगले काय आणि वाईट काय हे ठरविताना परिणामाच्या शक्यता नकाराने असाही याचा अर्थ होतो.
नैतिकतेची मध्यवर्ती संकल्पना काय आहे ?
What is the Central idea of morality ?
1)How people should react
2)How people should agitate
3)How people should live their lives✓ Correct
4)How people should compare with others
Morality fundamentally deals with human conduct, prescribing how individuals ought to live and interact in society.
2030 अजेंडा साध्य करण्यासाठी शाश्वत विकास साधण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शाश्वत शिक्षण समायोजित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पुढाकार स्थानिक पातळीवरून यायला हवा. या अनुषंगाने एक शालेय जिल्हा पर्यावरणीय स्थितेवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे.
जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही :
(1) नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थीयांशी सल्लामसलत कराल.
(2) पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्त्वांशी संरक्षित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल.
(3) नवीन अभ्यासक्रम वितरीत करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचे प्रशिक्षण द्याल्.
(4) अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल.
Education is a key factor for achieving sustainable development in order to achieve 2030 Agenda. A signification initiative towards integrating sustainable education should come from local level. In accordance a school district is considering implementing a new curriculum focussed on environmental sustainability.
As a District Educational Authority you will :
(1) Consult with educators, parents and students to gather feedback for new curriculum.
(2) Develop teaching materials and resources aligned with the principles of environmental sustainability.
(3) Train teachers on effective instructional strategies for delivering the New Curriculum.
(4) Generate funds for designing the curriculum.
1)नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थीयांशी सल्लामसलत कराल.✓ Correct
2)पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्त्वांशी संरक्षित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल.
3)नवीन अभ्यासक्रम वितरीत करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचे प्रशिक्षण द्याल्.
4)अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 2.5 marks(2) 1 marks(3) 1.5 marks(4) 0 marks
As a District Educational Authority implementing a sustainability curriculum, the primary step is stakeholder consultation (teachers, parents, students) to gather feedback.
🏛️ The Maharashtra angle
Applicable to Zilla Parishad education planning and state curriculum frameworks.
एका शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात. तुम्हाला युद्धात भयावहतेपेक्षा मर्दमुकी पाहाणाऱ्या आजच्या सार्वजनिक मानसिकतेमध्ये काहीतरी गंभीरपणे चुकते आहे असे वाटते. बहुतेक इतिहासात युद्धाचा गौरव करण्यात आला आणि त्यासोबत निष्पाप लोकांची हत्या आणि लूट या दोन्ही बाजूंचे नुकसान म्हणून दुर्लक्ष केले गेले. मानवी हक्क केंद्रस्थानी प्रस्थापित करून युद्धाचा उदोउदो करण्याच्या जागतिक दृष्टिकोनाला युरोपियन प्रबोधनाने आव्हान दिले. यामुळे युद्धे संपली नाहीत तसेच त्यांच्यामार्फत होणारा देशभक्तीचा उदोउदोही थांबला नाही. गांधीवादी अहिंसा स्वातंत्र्य चळवळीदरम्यान वसाहतवादी जुलूमशाहीचा नैतिक आणि व्यावहारिक प्रतिकार म्हणून स्वीकारण्यात आली होती पण युद्धाला विरोध व शांतता प्रस्थापिती विशेष काही केले जात नाही ही तुमची खंत आहे. तुम्ही ...
एका शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात. तुम्हाला युद्धात भयावहतेपेक्षा मर्दमुकी पाहाणाऱ्या आजच्या सार्वजनिक मानसिकतेमध्ये काहीतरी गंभीरपणे चुकते आहे असे वाटते. बहुतेक इतिहासात युद्धाचा गौरव करण्यात आला आणि त्यासोबत निष्पाप लोकांची हत्या आणि लूट या दोन्ही बाजूंचे नुकसान म्हणून दुर्लक्ष केले गेले. मानवी हक्क केंद्रस्थानी प्रस्थापित करून युद्धाचा उदोउदो करण्याच्या जागतिक दृष्टिकोनाला युरोपियन प्रबोधनाने आव्हान दिले. यामुळे युद्धे संपली नाहीत तसेच त्यांच्यामार्फत होणारा देशभक्तीचा उदोउदोही थांबला नाही. गांधीवादी अहिंसा स्वातंत्र्य चळवळीदरम्यान वसाहतवादी जुलूमशाहीचा नैतिक आणि व्यावहारिक प्रतिकार म्हणून स्वीकारण्यात आली होती पण युद्धाला विरोध व शांतता प्रस्थापिती विशेष काही केले जात नाही ही तुमची खंत आहे. तुम्ही ...
a)शाळेच्या ग्रंथालयात संग्रहित केलेल्या जगातील विविध संघर्षसंबंधाine चर्चा संबंधित पक्षातील दुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट करणाऱ्या साहित्याचे वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या.
b)मर्दमुकीच्या, युद्धाच्या, देशभवतीच्या गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवल्याखेरीज देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात दाखल व्हायला सज्ज असणारे तरुण-तरुणी घडवणे शक्य नाही हे लक्षात घेऊन शांततेचा विचार टाळा.
c)अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने अस्सल ऐतिहासिक दस्तावेज अभ्यासून त्याआधारे इतिहास अभ्यासक्रमातील विविध संघर्षांचे वर्गात चिकित्सक विश्लेषण करून त्यांच्या्या समाजात झालेल्या दीर्घकालीन परिणामांचे आकलन करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करायला अध्यापकांना प्रोत्साहन द्या.
d)'युद्ध म्हणजे मर्दमुकी नसून स्वतःला विचारी म्हणणाऱ्या माणसांचे ते अपयश आहे. मूर्खपणा व शौर्यांचा यंचा अनुभव घेणाऱ्या सैनिकांसाठी युद्धाचा शेवट विनाशच असतो. त्यामुळे शांतता प्रस्थापित होत नाही' या सत्याचे विद्यार्थ्यांना आकलन करून घ्यायला मदत देण्यासाठी पालक व अध्यापक यांच्या सहभागाने विविध उपक्रम सातत्याने कराल.✓ Correct
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 1 marks(2) 0 marks(3) 1.5 marks(4) 2.5 marks
Educating students through parental and teacher involvement to understand that war is a failure of human reason and leads to destruction promotes true peace.
🏛️ The Maharashtra angle
Aligns with progressive educational values and Gandhian thoughts promoted in Maharashtra.
तुम्हा एका कचेरीचे प्रमुख आहात. कचेरी सचिवालयawar कचेरी कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या मर्यादित संख्येने असलेल्या घरांच्या वाटपाची जबाबदारी आहे. ही घरे कचेरीच्या जवळ आहेत. संस्थेच्या उच्चपदस्थांनी घालून दिलेल्या नियमांनुसार हे वाटप केले जाते व ते नियम सचिवालय्याकडून जाहीर झाले आहेत. तुमची दूरची नातेवाईक याच कचेरीत तुमची वरिष्ठ साहाय्यक म्हणून काम करते. तिला तिच्या सासरच्या आजारी माणसांची काळजी घ्यावी लागत असल्यामुळे घराच्या वाटपात तिला प्राधान्य दिले पाहिजे अशी तिने विनंती केली आहे. एका अन्य कनिष्ठ कर्मचाऱ्याने देखील त्याला त्याच्या आजारी पत्नीची काळजी घ्यावी लागत असल्याने त्याला घर द्यावे अशी विनंती सचिवालयाकडे केली आहे. संचिवांनी नियमांकडे बोट दाखवून तिची विनंती नाकारली आहे आणि त्याच नियमांच्या आधारे कनिष्ठाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन त्याला घर दिले आहे. आता तुमची नातेवाईक तुम्ही त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला दिलेले घर तिला मिळवून द्यावे, यासाठी तुमच्यावर दबाव आणत आहे आणि तुम्हाला तिची निराशा टाळायची आहे. तुम्ही
तुम्हा एका कचेरीचे प्रमुख आहात. कचेरी सचिवालयawar कचेरी कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या मर्यादित संख्येने असलेल्या घरांच्या वाटपाची जबाबदारी आहे. ही घरे कचेरीच्या जवळ आहेत. संस्थेच्या उच्चपदस्थांनी घालून दिलेल्या नियमांनुसार हे वाटप केले जाते व ते नियम सचिवालय्याकडून जाहीर झाले आहेत. तुमची दूरची नातेवाईक याच कचेरीत तुमची वरिष्ठ साहाय्यक म्हणून काम करते. तिला तिच्या सासरच्या आजारी माणसांची काळजी घ्यावी लागत असल्यामुळे घराच्या वाटपात तिला प्राधान्य दिले पाहिजे अशी तिने विनंती केली आहे. एका अन्य कनिष्ठ कर्मचाऱ्याने देखील त्याला त्याच्या आजारी पत्नीची काळजी घ्यावी लागत असल्याने त्याला घर द्यावे अशी विनंती सचिवालयाकडे केली आहे. संचिवांनी नियमांकडे बोट दाखवून तिची विनंती नाकारली आहे आणि त्याच नियमांंच्या आधारे कनिष्ठाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन त्याला घर दिले आहे. आता तुमची नातेवाईक तुम्ही त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला दिलेले घर तिला मिळवून द्यावे, यासाठी तुमच्यावर दबाव आणत आहे आणि तुम्हाला तिची निराशा टाळायची आहे. तुम्ही
a)सचिवालयाला वाटपाचा आदेश राखून ठेवण्याचा आणि वाटप जाहीर करणे शक्य तेवढे लांबवण्याचा आदेश चाल.
b)नातेवाईकांच्या आजारासारख्या व्यक्तिगत समस्येसारख्या कोणत्याही विनंतीला विचारात न घेता घरांचे वाटप करण्याचे आदेश सचिवालय्याला द्या.
c)तिचे व इतर नातेवाईकांचे तुमच्याबरोबरचे संबंध ताणले जाण्याची शक्यता नसूनही निर्धारित नियम काटेकोरपणे पाळले असल्यामुळे सचिवालय्याच्या टिपणाशी सहमत व्हाल.
d)तुमच्या उपस्थितीत तिची विनंती विचारात न घेण्याच्या निर्णयासंबंधीची तात्विक बैठक तिच्यासाठी स्पष्ट करण्याची विनंती सचिवालय्याला कराल.✓ Correct
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 0 marks(2) 1 marks(3) 1.5 marks(4) 2.5 marks
Strict rules were correctly followed by the secretariat for the junior employee based on valid grounds. Requesting the secretariat to explain the rational basis of the decision to your relative helps maintain integrity while handling personal relations sensitively.
🏛️ The Maharashtra angle
Common dilemma faced by public servants dealing with extended family pressures.
दर वर्षी 20 मार्च हा दिवस जागतिक समाधान दिवस म्हणून साजरा केला जातो. अध्यापक आणि अध्ययनार्थीना समाधानानाने जगण्याच्या प्रक्रियेबाबत जागरूक करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून तुम्हाला शाळेत 'समाधान दिन' साजरा करायचा आहे. समाधान दिन साजरा करण्याच्या कल्पना मिळवण्यासाठी तुम्ही अध्यापक-पालक सभा घेतली. तुम्ही विविध वर्गातील मुलांशी बोलlat तेव्हा प्रौढ तसेच मुले यांच्या समाधानांच्या कल्पना समान आहेत असे तुम्हाला आढळले. स्वतः निवडलेल्या देवतेच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी तुम्ही बोलlat तेव्हा तेही मोठ्या रकमेतून विकत घेता येईल असे काही तरी मिळवण्यासाठी प्रार्थना करत होते.
तुम्ही विविध वर्गातील मुलांशी बोलlat तेव्हा प्रौढ तसेच मुले यांच्या समाधानांच्या कल्पना समान आहेत असे तुम्हाला आढळले. स्वतः निवडलेल्या देवतेच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी तुम्ही बोलlat तेव्हा तेही मोठ्या रकमेतून विकत घेता येईल असे काही तरी मिळवण्यासाठी प्रार्थना करत होते. तुम्ही
a)सभेला जमलेल्या बहुसंख्य लोकांनी सुचवल्यानुसार अध्यापक व अध्ययनार्थीना शाळेत समाधान देणारे काहीही करण्याची मुभा द्याल आणि प्रत्येकने जीवनात अनुभवलेल्या काही समाधान देणाऱ्या घटनांची थोडक्यात माहिती लिहिण्याची विनंती कराल.
b)स्वतःचे काम करत आनंदने जगणाऱ्या आणि साधे आयुष्य जगणाऱ्या तुमच्या निरीक्षणातील काही लोकांना बोलावून त्यांना स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यांबरोबर सहभागी करण्याची विनंती कराल.
c)अध्यापक आणि पालक यांची सहभागाने समाधानविषयक कल्पना रचण्यासाठी आणि प्रत्येक अध्ययनार्थीला अध्ययन प्रक्रिया आनंददायी वाटण्यासाठी अध्ययन अनुभव रचण्यासाठी साहाय्य देण्यासाठी सत्रे आयोजित कराल.✓ Correct
d)नियमितपणे आध्यात्मिक व्याख्यान ऐकणाऱ्या मोजक्या लोकांनी सुचवल्यानुसार विद्यार्थी व अध्यापकांना शाश्वत समाधानाची जाणीव करून देण्यासाठी ख्यातनाम आध्यात्मिक व्यक्तीचे व्याख्यान आयोजित कराल.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 1.5 marks(2) 1 marks(3) 2.5 marks(4) 0 marks
Organizing collaborative sessions involving teachers and parents to co-create concepts of satisfaction and make the learning process joyful addresses the core root of meaningful learning and student well-being.
🏛️ The Maharashtra angle
Relevant to educational reforms and teacher-parent associations (PTA) in schools.
तुम्ही एका भागाची जबाबदारी असलेले वरिष्ठ नागरी अधिकारी आहात आणि तुम्हाला वृद्धांसाठी खाजगीरीत्या चालवल्या जाणाऱ्या घरांच्या वार्षिक सम्मेलनासाठी अतिथी म्हणून उपस्थित राहाण्याची विनंती करण्यात आली आहे. या जागी पोहचण्यासाठी प्रवास करताना तुम्हाला जागोगागी मोडकळी आलेल्या झोपड्यांच्या अनेक वस्त्या पाहायला मिळाल्या. जेव्हा तुम्ही चौकशी केली तेव्हा वृद्धांसाठी घरे निर्माण करणाऱ्या विकासकांनी त्यांचे सर्व स्रोत हडप केले असून त्यांना लहानशा जागेत राहण्यास भाग पाडल्याचे या लोकांनी सांगितले. वृद्धांसाठी घरांची वस्ती निर्माण करणारे व त्यात रहाणारे लोक उच्च जातीचे असल्यामुळे त्यांना नदीचे पाणी वापरण्यास, नदीत आंघोळ करण्यास वा मासेमारी करण्यास, वनोपज वापरण्यास मज्जाव करत असल्याचेही त्यांनी तुम्हाला सांगितले. तुम्ही पुढील पैकी _________________
1)make and execute a plan for empowering people in the area with the help of teachers of the colleges from the urban part of the area who are interested in giving their students practical experience related to the theories of humanities and sociology, by procuring funds from corporates.✓ Correct
2)cancel your visit to the gathering, expressing your distress about the situation, and order the authorities of the old age home to give these people their dues and allow them to enjoy the resources in the area.
3)attend the gathering, get correct information about the situation, and convince the organizers and inmates to have some sympathy towards the real owners of the resources during your speech in a friendly manner.
4)don't take any action as you believe that everyone has to live with one's fate.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 2.5 marks(2) 1 marks(3) 1.5 marks(4) 0 marks
The displaced tribal families need lasting empowerment, not a gesture. A funded plan with local college teachers and their students works with the people themselves to build their capacity and claim their rights, which is why MPSC gives it full marks. Cancelling the visit and issuing orders (2) or appealing for sympathy in a speech (3) changes little, and doing nothing (4) earns zero.
वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थीना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधी निर्णय घ्यायला साहाय्य करण्याचा कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे नसलेली चारचाकी आढळली. प्रशिक्षणार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशीलात जाऊन चौकशी केली. तो स्वतःच संबंधित गाडीचा मालिक आहे आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. स्वतःच्या दाव्यासंबंधी सर्व दस्तऐवजी त्याने दाखवले. प्रशिक्षणार्थीने त्याला बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फर्मावले. मी जाणूनबुजून नियम मोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईन असे चालक गवाया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे. तुम्ही सुचवाल;
वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थीना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधी निर्णय घ्यायला साहाय्य करण्याचा कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे नसलेली चारचाकी आढळली. प्रशिक्षणार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशीलात जाऊन चौकशी केली. तो स्वतःच संबंधित गाडीचा मालिक आहे आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. स्वतःच्या दाव्यासंबंधी सर्व दस्तऐवजी त्याने दाखवले. प्रशिक्षणार्थीने त्याला बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फर्मावले. मी जाणूनबुजून नियम मोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईन असे चालक गवाया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे. तुम्ही सुचवाल;
a)नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना आपण नेहमीच विभागाने निर्धारित केलेला दंड केला पाहिजे कारण सुव्यवस्था राखणे हे आपले कर्तव्य आहे.
b)व्यक्ती गरजू वाटते म्हणून तिला वाजवी रक्कम दंड म्हणून द्यायला सांगा आणि तो तिचा पहिला गुन्हा आहे म्हणून जाऊ द्या.
c)त्याला काही वेळ न्यायालयीन कोठडीत ठेवून नंतर समज देऊन सोडून देणे डीक होईल.
d)दुर्लक्ष होण्यासंबंधी चालकाकडे सबळ कारण असल्यामुळे त्याचं जगणं कठीण करण्याऐवजी त्याला कडक समज देऊन सोडून द्या.✓ Correct
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 0 marks(2) 1.5 marks(3) 1 marks(4) 2.5 marks
When dealing with rule violations where there is a valid, extenuating personal reason and genuine remorse, an administrative officer should exercise empathy combined with a strict warning rather than punitive heavy fines.
तुम्ही शहराच्या प्रदूषण नियंत्रणावर देखरेख करणाऱ्या विभागाचे प्रमुख आहात. 'ग्लोबल (जागतिक) हवा 2017' अहवाल वाचताना तुमच्या लक्षात आले की भारतातील ओझोनशी संबंधित बालमृत्युत वाढ होत आहे. तुम्ही / You are heading the department that looks after control of pollution in the city. While reading the report, 'State of Global Air 2017' it was evident to you that ozone related early deaths are increasing in India. You will
a)या समस्येबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आवश्यक माहिती गोळा कराल आणि गरज असल्यास आरोग्य विभागाच्या सहकार्याने उपक्रम कार्यान्वित करण्याचा निर्णय घ्याल. / Collect related data to know the reality of this problem in your city and then decide a course of action, if necessary, in collaboration with the health department.
b)शहराच्या वाहतूक विभागाच्या साहाय्याने वाहन प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भरवशाची सार्वजनिक वाहतूक पुरवण्याची योजना आखाल. / With the assistance of the transport department of the city, you will devise a plan for supplying reliable public transport for controlling vehicular pollution.✓ Correct
c)वाहन प्रदूषण नियंत्रणाची रणनीती आखण्याबरोबरच शहरात तसेच शहराभोवती आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची प्रणाली मिळवाल. / Along with developing strategies for controlling vehicular pollution, seek modern systems of managing garbage of all kinds found in the city as well as around the city.
d)वाहतूक विभागाच्या मदतीने दर दिवशी रस्त्यावर येणारी वाहने नियंत्रित कराल आणि शहरापासून दूरवर असलेल्या ठिकाणी कचरा वाहून नेण्यासाठी उत्तम सेतूजाल संघटित कराल. / With the help of the transport department, control the number of vehicles on the roads each day and organise a good network to transport garbage to a place away from the city.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 0 marks(2) 2.5 marks(3) 1.5 marks(4) 1 marks
Addressing ozone-related health hazards requires tackling the primary urban source—vehicular emissions—by establishing robust and reliable public transport systems in coordination with transport departments.
🏛️ The Maharashtra angle
Applicable to urban centers like Mumbai and Pune facing severe vehicular pollution and air quality issues.
तुम्ही एका शासकीय संघटनेला सेवा देणाऱ्या रुग्णालयाचे प्रमुख आहात. एका कर्मचाऱ्याकडून तुमच्याकडे लेखी तक्रार आली असून त्याने त्याचा गसा खूप दुखत आहे आणि गेले तीन दिवस त्याने घट्ट आहार घेतला नसल्याचे लिहिले आहे. पुढे त्याने लिहिले आहे की दोन कारणांमुळे त्याला योग्य सेवा मिळू शकलेली नाही; एक म्हणजे तो आरक्षित वर्गातील आहे आणि दुसरं म्हणजे तो कोणत्याही उच्च पदावर काम करत नाही. प्रमुख म्हणून या तक्रारीत काही तथ्य आहे हे तुम्हाला माहीत आहे. गोष्टी सरळ करण्यासाठी तुम्ही,
(1) रुग्णची चिकित्सा करून त्याला पुढील उपचारासाठी संबंधित विशेषज्ञकडे सोपवून त्याचे समाधान होईपर्यंत त्यांचे पर्यवेक्षण कराल.
(2) रुग्णाच्या आजाराच्या व त्याने केलेल्या आरोपंच्या गांभीर्याची चर्चा करण्यासाठी सहकाऱ्यांची व हाताखालील कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित कराल.
(3) या प्रश्नाला गांभीर्याने न घेण्याची रुग्णाला विनंती कराल व वेळ मिळताच या समस्यात लक्ष घालण्याचे त्याला आश्वासन द्याल.
(4) संबंधित डॉक्टरांना या तक्रारीत लक्ष घालण्यास व व्यक्तिगत पातळीवर समस्या मिटवण्यास सांगाल.
a)रुग्नाची चिकित्सा करून त्याला पुढील उपचारासाठी संबंधित विशेषज्ञकडे सोपवून त्याचे समाधान होईपर्यंत त्यांचे पर्यवेक्षण कराल.
b)रुग्णाच्या आजाराच्या व त्याने केलेल्या आरोपांच्या गांभीर्याची चर्चा करण्यासाठी सहकाऱ्यांची व हाताखालील कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित कराल.✓ Correct
c)या प्रश्नाला गांभीर्याने न घेण्याची रुग्णाला विनंती कराल व वेळ मिळताच या समस्यात लक्ष घालण्याचे त्याला आश्वासन द्याल.
d)संबंधित डॉक्टरांना या तक्रारीत लक्ष घालण्यास व व्यक्तिगत पातळीवर समस्या मिटवण्यास सांगाल.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 1.5 marks(2) 2.5 marks(3) 0 marks(4) 1 marks
When facing a grievance regarding discrimination based on reservation or social status, a hospital head must first address the systemic issue through collective discussion and serious inquiry rather than brushing it aside.
🏛️ The Maharashtra angle
Highlights institutional accountability in public healthcare facilities across state hospitals.
संकिचित बोधामुळे व्यक्तीला प्राप्त झालेल्या सौंदर्य भानाचा परिणाम नसलेली कृती निवडा.
Select an action that is not resulted from aesthetic consciousness gained due to person's narrow perceptions.
1)शाकाहारी व्यक्ती मांसाहारी व्यक्तीबद्दल अवमान करणारे शेरे देते. / A vegearian person makes derogatory remarks about a non-vegetarian person.
2)व्यक्ती स्वत:चे पर्यावरण स्वच्छ राखण्याची काळजी घेत नाही. / A person does not care to keep his or her environment clean.
3)शाळेचे मुख्याध्यापक निम्न उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील बालकाला प्रवेश नाकारतात. / A school principal refuses to admit a child from a low income family.
4)व्यक्ती प्रत्येक अन्य व्यक्तीचा विनाअट आदर करते. / A person respects every other person unconditionally.✓ Correct
A narrow perception limits aesthetic appreciation, but broad consciousness fosters inclusivity, making options reflecting biased views incorrect.
संबंधित व्यक्तीच्या सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केली आहे हे निर्देशित करणाऱ्या वर्तनाची निवड करा.
Select the behaviour that indicates concerned person's aesthetic sense has either attained or is in the process of attaining emancipation.
(a)सर्वांना सहजतेने प्रसन्न करणाऱ्या विविध पैलूंचा व्यक्ती स्वतःच्या सौंदर्याच्या अभिव्यक्तीमध्ये समाविष्ट करते.
(b)साचेबद्ध मान्यतेमुळे ज्या प्रतिरूपणांची सौंदर्यपूर्ण अशी स्तुती केली जाते त्यामुळे व्यक्ती भारावून जात नाही.
(c)गोष्टी विद्रूप स्वरूपात पाहिल्या जाऊ नयेत म्हणून व्यक्ती स्वतःची आकलननाची ताकद वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते.
1)अ वगळून सर्व / All but a✓ Correct
2)ब वगळून सर्व / All but b
3)क वगळून सर्व / All but c
4)सर्व / All the above
A person whose aesthetic sense has attained emancipation is not overwhelmed by stereotyped socially praised representations (statement b), and actively expands comprehension rather than viewing things as distorted (statement c). Statement 'a' is excluded because including everyone's pleasing aspects universally isn't the core of emancipation.
तुमच्या भागात एक देऊळ आहे आणि अनेक भिन्न लिंगी व्यक्ती स्वतःच्या उपजीविकेसाठी येथे राहतात. त्यासाठी ते लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे उकळतात. विभागातील एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या मनोविज्ञान विभागाला या समस्येचा अभ्यास करून अहवाल तयार करायला सांगितला. या अहवालाच्या आधारे तुम्ही
There is temple in your area and many different gender persons reside in this area for making their living by exhorting money by creating fear in the minds of other people. As a responsible officer of the area you request the head of the Psychology Department of one college in the district to study the problem and prepare a report. On the basis of this report you will
a)जबाबदार संस्थांशी, लोकांना या परिस्थितीबाबत जागरूक करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात संपर्क साधाल. / approach responsible institutions for organizing programmes to make people aware of this situation.
b)शैक्षणिक संस्थांच्या मदतीने या लोकांसाठी कौशल्य प्रशिक्षण उपक्रम आयोजित कराल. / with the help of educational institutions organize skill training programmes for these people.
c)तज्ञांच्या मदतीने या लोकांशी संपर्क साधून त्यांना कौशल्य प्राप्तीसाठी व स्वयंउद्योजक होण्यासाठी मदत कराल. / approach leaders of these persons and with the help of experts help them to acquire skills and become entrepreneurs.✓ Correct
d)या लोकांच्या पुढाऱ्यांना भेटून लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करणे थांबवा असे सांगाल. / approach leaders of these people and ask them to stop inculcating superstitions in the minds of people.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 1 marks(2) 1.5 marks(3) 2.5 marks(4) 0 marks
Approaching leaders of these persons with experts to help them acquire skills and become entrepreneurs addresses the root economic cause of their livelihood while ending fear-based extortion.
🏛️ The Maharashtra angle
Relates to rehabilitation policies for nomadic and de-notified tribes (NT/DNT) in Maharashtra.
तुमच्या कचेरीतील एक व्यक्ती वेगवेगळ्या वंशाची असून आणखी एक व्यक्ती दुसऱ्या धर्माची आहे. तुमच्या सहकाऱ्यांचा एक गट या दोन्ही व्यक्तींची त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या पेहराव्यावरून चेष्टा करतात व त्यांना अस्वस्थ करतात. यावर तुम्ही,
In your office there is one person of a different race and another person from a different religion. A group of your colleagues make fun of them due to their appearance and way of dressing and make them uncomfortable. You will,
a)या गटात सहभागी होणार नाही आणि गप्प बसाल. / not join this group and keep quiet.
b)या गटाशी मैत्री कराल आणि हळू हळू त्यांना अशा चेष्टेमुळे व्यक्तीला काय वाटत असेल हे समजून घ्यायला मदत द्याल. / befriend this group and slowly help them understand how a person feels of this treatment.✓ Correct
c)या दोन व्यक्तींशी मैत्री कराल आणि त्यांना भावनिक आधार द्याल आणि त्यांना काही अतिरेकी पाऊल टाकण्यापासून वाचवाल. / befriend both these persons and give them emotional support and save them from taking any extreme step.
d)तुमच्या वरिष्ठांना या गटाला इतर व्यक्तींबरोबर सहानुभूतीपूर्ण वागायला मदत देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती कराल. / request your seniors to organize some programme to help them to be empathetic with all persons.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 0 marks(2) 2.5 marks(3) 2 marks(4) 1 marks
Befriending the offending group and slowly helping them understand the impact of their discriminatory behavior fosters empathy and addresses the root of workplace harassment.
🏛️ The Maharashtra angle
Applicable to maintaining inclusive work culture in government and private offices across Maharashtra.